टेस्ट क्र-285 | मराठी व्याकरण + GK
1.‘परोक्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
1.प्रत्यक्ष
2.अप्रत्यक्ष
3.पराधीन
4.दृष्टीआड
2. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. या वाक्यातील मूळ उद्देश्य.........आहे.
1.पांढरी टोपी
2.टोपी घातलेला
3.खोड्या करतो
4.मुलगा
3. पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही. म्हण आहे.
1.कान उघडणी करणे
2.डोक्यावर बसणे
3.नाक मुरडणे
4.आसू ना मासू कुत्र्याची सासू
4. 'वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते. या अर्थाची म्हण सांगा.
1.दुभत्या गाईच्या लाथा गोड
2.रोज मरे त्याला कोण रडे
3.पुढच्यास ठेच मागचा शहाणा
4.झाकली मूठ सव्वा लाखाची
5. _______ हा शब्द तत्सम नाही.
1.पूजा
2.गीता
3.लीला
4.मेहनत
6. पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे.
1.ताई
2.बाजरी
3.गुडघा
4.झोप
7. मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नाव काय ?
1.प्रमुख
2.प्रधान
3.गौण
4.अगौण
8. दिलेल्या वाक्यसमूहातून म्हण शोधा.
1.सापाला दूध पाजणे
2.जिभेला हाड नसणे
3.वरातीमागून घोडे
4. धारातीर्थी पडणे
9. मला ताप आला आहे, मी शाळेस येणार नाही. ( केवल वाक्य करा )
1.ताप आला शाळेस कशाला जाऊ ?
2.मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.
3.मला ताप आल्यामुळे शाळेस जाणे बरे नव्हे.
4.शाळेला जाणार नाही कारण ताप आला आहे.
10. कृष्णाचे वडील आजारी पडले, त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना _______ !
1.इकडे आड तिकडे विहीर
2.दुष्काळात तेरावा महिना
3.घरचे झाले थोडे अन् व्यायाने धाडले घोडे
4.आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना
11) सविनय कायदेभंग आंदोलन गांधीजींनी कोणत्या वर्षी सुरू केले ?
1.1920
2.1924
3.1930
4.1942
12) . खालीलपैकी कोणती व्यक्ती तिन्हींही गोलमेज परिषदांचा हजर होती ?
1.महात्मा गांधी
2.डॉ आंबेडकर
3.डॉ राजेंद्र प्रसाद
4.पंडित नेहरू
13) 1878 मध्ये शस्त्रबंदी कायदा कोणत्या व्हॉइसरॉयने लागू केला ?
1.लॉर्ड डलहौसी
2.लॉर्ड कॅनिंग
3.लॉर्ड लिटन
4.यापैकी नाही
14) शरीरातील सर्वात व्यस्त अवयव कोणता ?
1.हृदय
2.यकृत
3.फुप्फुस
4.डोळे
15) प्लास्टर ऑफ पॅरिसचे रासायनिक नाव काय ?
1.कॅल्शियम सल्फेट
2.पोटॅशियम परमॅगनेटच्या
3.कॅल्शियम ऑक्साईड
4.सोडियम कार्बोनेट
टिप्पणी पोस्ट करा