महाबळेश्वर,पाचगणी UNESCO च्या तात्पुरत्या यादीत समावेश | Mahabaleshwar,Pachgani included UNESCO list
जागतिक वारसा यादीत अंतिम समावेश होण्यापूर्वी ठिकाणांचा तात्पुरत्या यादीत समावेश होणे बंधनकारक असते. त्यामुळे वारसा संवर्धनासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
सध्या तात्पुरत्या यादीतील स्थळांची संख्या 69 वर
देशभरातील 7 ठिकाणांच्या समावेश झाल्यामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीतील ठिकाणांची संख्या आता 69 वर पोहोचली आहे. त्यात 49 सांस्कृतिक, 3 मिश्र आणि 17 नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश असल्याचेही UNESCO भारतातील स्थायी समितीने स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा