गणित सराव चाचणी: ५ MCQ प्रश्न व उत्तरे | गणित मार्गदर्शन

 

गणित मार्गदर्शन ऑनलाइन गणित सराव चाचणी मराठी MCQ प्रश्न उत्तरे व स्पष्टीकरण

गणित सराव चाचणी मराठी

गणित MCQ प्रश्न उत्तरे

स्पर्धा परीक्षा गणित प्रश्न

गणित ऑनलाइन टेस्ट

गणित प्रश्न स्पष्टीकरणासह

Maths MCQ Test in Marathi

गणित मार्गदर्शन

सराव चाचणी | एकूण प्रश्न: ५ | एकूण गुण: ५

प्रत्येक प्रश्नाला १ गुण

प्रश्न १. एका पाण्याच्या टाकीची लांबी ८ मीटर, रुंदी ६ मीटर व उंची ५ मीटर आहे. टाकीमध्ये ३.५ मीटर उंचीपर्यंत पाणी आहे. टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखी किती पाणी लागेल?
स्पष्टीकरण: उर्वरित उंची = ५ − ३.५ = १.५ मीटर. आवश्यक पाणी = ८ × ६ × १.५ = ७२ घनमीटर.
प्रश्न २. २, ०, ५, ९, ८ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वांत मोठ्या व सर्वांत लहान पाच अंकी संख्यांची वजाबाकी केल्यास उत्तरातील सर्व अंकांची बेरीज किती?
स्पष्टीकरण: मोठी संख्या = ९८५२० आणि लहान संख्या = २०५८९. फरक = ७७९३१. अंकांची बेरीज = ७ + ७ + ९ + ३ + १ = २७.
प्रश्न ३. २०० व्यक्तींपैकी ९० व्यक्तींना चहा, १०८ व्यक्तींना कॉफी आणि ४६ व्यक्तींना चहा व कॉफी दोन्ही आवडतात. तर किती व्यक्तींना यांपैकी काहीही आवडत नाही?
स्पष्टीकरण: चहा किंवा कॉफी आवडणारे = ९० + १०८ − ४६ = १५२. काहीही न आवडणारे = २०० − १५२ = ४८ व्यक्ती.
प्रश्न ४. १ सेंटीमीटर म्हणजे अंदाजे किती इंच?
स्पष्टीकरण: १ इंच = २.५४ सेंटीमीटर. म्हणून १ सेंटीमीटर = १ ÷ २.५४ ≈ ०.३९४ इंच.
प्रश्न ५. तीन सलग पूर्णांकांची बेरीज १७७ आहे. तर त्यांतील मधली संख्या कोणती?
स्पष्टीकरण: सलग तीन संख्यांमधील मधली संख्या = १७७ ÷ ३ = ५९. संख्या ५८, ५९, ६० आहेत.
जॉईन करा टेलिग्राम चॅनल @ganitmargdarshan

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने