मराठी व्याकरण टेस्ट क्र- 25 | marathi vyakaran test

1) 'आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो'. हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते ?*

1. केवलवाक्य
2. संयुक्तवाक्य
3. मिश्रवाक्य
4. विकल्पबोधक

2) 'स्तब्ध बसणे' हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार असणारा पर्याय निवडा :*

1. अकाली पडलेली संसाराची जबाबदारी पार पाडताना सतीशचा ऊर फुटून गेला.
2. सभेत श्रोत्यांची गर्दी पाहून वक्त्याचा ऊर दडपून गेला.
3. प्रसंग उद्भवला असताना कच खाणे ध्येयवादी माणसाला योग्य नाही.
4. युद्धाच्या काळात बरीच राष्ट्रे उद्ध्वस्त होतात.

3) 'कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.*

1. आज्ञार्थ क्रियापद .
2. विध्यर्थ क्रियापद
3. संकेतार्थ क्रियापद
4. शक्य क्रियापद

4) पुढील विधान वाचा,
💎 प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
*

1. पूर्वार्ध बरोबर
2. उत्तरार्ध बरोबर
3. संपूर्ण विधान बरोबर
4. संपूर्ण विधान चूक


5) 'सध्या मी जातककथांचा अभ्यास करतो आहे. वरील वाक्याचा प्रकार कोणता ?*

1. विधानार्थी
2. केवलवाक्य
3. होकारार्थी
4. यापैकी नाही

6) पुढीलपैकी केवल वाक्य ______*

1. ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते.
2. तो नेहमी उत्कृष्ट काम करतो.
3. पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते.
4. वरील सर्व पर्याय बरोबर

7) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययांनी जोडली तर ________ वाक्य तयार होते.*

1. संयुक्त
2. मिश्र
3. केवल
4. उभयान्वयी अव्यय

8) अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता.' या वाक्याचा प्रकार कोणता ?*

1. विध्यर्थी
2. आज्ञार्थी
3. संकेतार्थी
4. स्वार्थी
1111111

9) 'माझे वडील आज परगावी गेले. या वाक्याचा प्रकार कोणता ?*

1. संकेतार्थी
2. विधानार्थी
3. नकारार्थी
4. होकारार्थी

10) ''आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार कोणता ?*

1. मिश्र वाक्य
2. केवल वाक्य
3. संयुक्त वाक्य
4. यापैकी नाही
1111

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने