1. एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 सेमी जास्त आहे. त्या आयताची परिमिती 50 सेमी असल्यास त्याची लांबी किती?
1) 8 सेमी
2) 25 सेमी
3) 15 सेमी
4) 17 सेमी
2. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्याच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती ?
1) 16 वर्षे
2) 15 वर्षे
3) 11 वर्षे
4) 12 वर्षे
3. एक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील ?
1) 10 तास
2) 12 तास
3) 15 तास
4) 8 तास
4. रोज 13 किग्रॅ 500 ग्रॅम पुरक खुराक 9 गाईना पुरतो, त्याचप्रमाणे 12 गाईंना रोज किती खुराक लागेल ?
1) 18 किग्रॅ
2) 16 किग्रॅ 500ग्रॅम
3) 17 किग्रॅ 500ग्रॅ
4) 19 किग्रॅ
5. संदीपने मुलाच्या शिक्षणासाठी दसादशे 8.5 दराने 120000 रुपये शैक्षणिक कर्ज 4 वर्षांसाठी घेतले त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकून किती रक्कम परत केली ?
1) 16000रु.
2) 160000रु.
3) 160800रु.
4) 16800रु.
6. एका वर्तुळाचा परिघ 198 सेंमी आहे तर त्याचा व्यास किती असेल?
1) 99 सेंमी
2) 31.5 सेंमी
3) 63 सेंमी
4) 32 सेंमी
7. 5 क्विंटल - 9 किग्रॅ = ?
1) 4.91 किग्रॅ
2) 490 किग्रॅ
3) 491 किग्रॅ
4) 4.89 किग्रॅ
8. दोन अंकी संख्यांचा गुणाकार 1280 आहे आणि त्यांची 4 मसावी आहे. तर त्यांचा लसावी काढा.
1) 288
2) 320
3) 440
4) 520
9. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या कोनांना परस्परांचे ____ आहेत असे म्हणतात.
1) पूरककोन
2) विरुध्दकोन
3) सरळकोन
4) कोटिकोन
10. अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेतीच्या दोन तृतीयांश भागात केळीची लागवड केली, तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती ?
1) 7 एकर
2) 14 एकर
3) 21 एकर
4) 3.5 एकर
टिप्पणी पोस्ट करा