1. 'तोंड' या अवयवावरून तयार झालेला पुढील कोणता वाक्प्रचार अपकीर्ती करणे या अर्थाचा आहे ?
1) तोंड येणे
2) तोंड काळे करणे
3) तोंडाला काळे फासणे
4) तोडघशी पडणे
2. खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी उत्तरांतील ‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.'कोणती आहे ? ‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.'
1) मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची ?
2) मांजराने दूध पाहिले, पण बडगा नाही पाहिला.
3) मांजरीचे दात तिच्या पिलास कधीच लागत नाहीत.
4) मांजर कावरते, खांबाला ओरवडते.
3. बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता. या वाक्यात सामान्यरूप असलेला शब्द कोणता आहे ?
1) गारुड्याचा
2) खेळ
3) चालू
4) होता
4. पुढीलपैकी दंततालव्य वर्णं कोणते ?
1) क्. ख ग् घ्
2) च्, इ, ज् झ्
3) ट्, द, ड्, द्
4)पू, फू, बू, भू
5. 'वा! वा! छान निबंध लिहिला आहेस तू !' या वाक्यात केवलप्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आलेला आहे ?
1) प्रशंसा दर्शक
2) विरोध दर्शक
3) मौन दर्शक
4) संमति दर्शक
6.वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला......म्हणतात.
1) भाववाचकनाम
2) सामान्यनाम
3) गुणविशेषनाम
4)विशेषनाम
7. त्याला नाहक दुप्पट व्याज भरावे लागले. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा?
गणनावाचक
क्रमवाचक
आवृत्ती वाचक
पृथक्त्ववाचक
8. ‘नागपुरात’ या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा?
सप्तमी
पंचमी
चतुर्थी
व्दितीया
9.‘विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ "विद्यार्थी " आधोरेखित शब्दाची जात ओळखा?
क्रियापद
नाम
सर्वनाम
विशेषनाम
10.‘तमा’ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता?
पर्वा
अंधार
आधार
पाप
टिप्पणी पोस्ट करा