Test-78 गणित मार्गदर्शन | ganitmargdarshan

मित्रांनो आजची ऑनलाईन टेस्ट हि गणित विषयातील नळ व टाकी या घटका वर आहे... 
5 पैकी 5 मार्क घेण्याचा प्रयत्न करा..

1) A व B दोन नळ एका भांडे 12 मिनिटात व 15 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरु करुन , 3 मिनिटांनी A नळ बंद केल्यास B नळास भांडे भरण्यास किती वेळ लागेल ❓
1) 8 मिनिट 15 सेकंद
2) 8 मिनिट 10 सेकंद
3) 12 मिनिट 2 सेकंद
4) 15 मिनीट 12 सेकंद
2) एक पाण्याची टाकी भरण्यासाठी 2 नळांची सोय आहे, पहिला नळाने टाकी भरण्यासाठी 3 तास लागतात, दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल❓
1) 200 मिनिट
2) 100 मिनीट
3) 120 मिनीट
4) 90 मिनिट

3) एक पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळांना अनुक्रमे 12 व 8 तास लागतात, तर तळाकडील तोटी ने ती टाकी 6 तासात रिकामी होते, जर ते दोन नळ आणि तोटी एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल❓
1) 24 तास
2) 22 तास
3) 20 तास
4) 18 तास

4) दोन नळ a आणि b  एक टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 36 तास व 45 तास लावतात. दोन्ही नळातून एकच वेळेस पाणी सोडले असता, ती टाकी किती वेळेत भरेल❓
1) 10 तास
2) 20 तास
3) 12 तास
4) 9 तास
5) एक नळ एका मिनिटात टाकीचा 2/7 भाग भरतो, तर पूर्ण टाकी किती वेळेत भरेल ❓
1) 11/3 मिनिट
2) 9/7 मिनिट
3) 7/2 मिनिट
4) 2/7 मिनिट

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने